Multi-Modal Transit Hub at existing railway station 1- Station Area Traffic Improvement Scheme (EAST)

भारतीय रेलवे सर्वात जुनी असलेली रेल्वे मार्गिका वरील ठाणे हे जुने रेलवे स्थानक आहे. हे रेल्वे सथानक मध्ये, रेल्वेच्या उपनगरीय रेल्वे स्थालकामधील सर्वाधिक गर्दीचे स्थानक आहे. ठाणे स्थानकामधून सद्यस्थितीत दररोज सुमारे 7.50 लक्ष प्रवासी प्रवास करतात. ठाणे रेल्वे स्थानकामध्ये येण्यासाठी दाटीवाटीने वसलेल्या जुन्या शहरांमधील अपुऱ्या मार्गाचा वापर करावा लागतो. यामुळे वाढत्या मागणीनुसार शहराअंतर्गतच्या रस्त्यावरील ताण प्रचंड वाढत असून वाहतुक कोंडीही दैनंदिन झाली आहे.

अधिक

ठाणे व मुलूंड दरम्यान मनोरुग्णालयाजवळ प्रस्तावित नविन उपनगरीय रेल्वे स्थानकासाठी परिचलनक्षेत्र विकसित करणे.

ठाणे आणि मुलुंड स्थानकांदरम्यान, ठाणे मनोरूग्णालयजवळ नवीन उपनगरीय रेल्वे स्थानक बांधणे.
This new sub-Urban railway station will be constructed on the land of regional mental hospital with area of 14.83 acres.

अधिक

खडी किनारा विकास व सुशोभिकरण

ठाणे शहराला 32 कि.मी. लांबीचा खाडी किनारा लाभाला आहे. सदर खाडीचे जतन, संवर्धन स्वच्छता, जलक्रिडा, पर्यटन केंद्र, कन्व्हेन्शन सेंटर, जॉगींग ट्रॅक, प्रोमेनेड अशा सुविधांचा विकास करणेसाठी खाडी किनारा विकास प्रकल्प तयार करण्यात आलेला आहे. सदर प्रकल्पाकरिता सक्षम प्राधिकरणांच्या मंजुऱ्या प्राप्त आहेत.

अधिक

गांवदेवी मैदानाखाली भुमिगत पार्किंगची निर्मिती करणे

ठाणे रेल्वे स्टेशन परिसर हा ठाणे महानगरपालिका हद्दीतील खूपच दाटीवाटीचा भाग असून या भागात पार्किंग साठी कोणतीही जागा उपलब्ध नाही. म्हणूनच स्टेशनच्या जवळपास पार्किंगची व्यवस्था करणे आवश्यक होते. दुचाकी आणि चार चाकी गाड्यांच्या पार्किंग साठी गावदेवी मैदान येथे भुमिगत पार्किंग सुविधा उभारण्याची योजना आहे. ही जागा खेळाच्या मैदानासाठी राखीव असल्या कारणाने महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने या जागेच्या सध्याच्या वापरावर निर्बंध न आणता भुमिगत पार्किंगची सुविधा निर्माण करण्याची परवानगी दिली आहे. पार्किंग सुविधा ही मैदानाखाली भुमिगत असेल व वरील भागात पूर्वीप्रमाणेच नागरिकांसाठी मैदान उपलब्ध राहील.
This place is a reservation for playground.

अधिक

पादचारी सुधारणा

सदर प्रकल्पांतर्गत पदपथाचे रुंदीकरण व नुतनीकरण , बोलार्ड बसविणे, नवीन कर्ब स्टोन बसविणे, ट्रॅफिक सायनेजेस, स्ट्रीट फर्निचर , लॅण्डस्केपिंग, स्कल्पचर्स इत्यादी कामांचा समावेश आहे.

अधिक

पावसाळी पाण्याचा निचराकरणाऱ्या नाल्यांचे बांधकाम करणे

पावासाळी पाण्याचा निचराकरणे ही पायाभूत सुविधापैकी महत्वाची पायाभूत सुविधा असून सदसयास्थितीत ठाणे महानगरपालिके मार्फत ही सुविधा देण्यात आलेले आहे. ठाणे महानगरपालिके मार्फत या आधीच नैसर्गिक नाला प्रवाह पक्क्या स्वरुपात बांधणेचे तसेच अस्तित्वातील नाल्यांचे मजबुतीकरण करण्याचे कामाकरीता एकात्मिक नाले विकास प्रकल्प राबविणेत आलेले आहे.

अधिक

अर्बन रेस्ट रूम

ठाणे महानगरपालिका ही ठाणे शहरासाठी स्वच्छतेच्या सुविधा प्राधान्‍याने पुरविण्याची जबाबदारी घेणारी स्वायत्त संस्था आहे. ठाणे रेल्वे स्थानक, एसटी स्थानक आणि स्थानिक प्रवासी वाहतूक या सर्व सुविधांचा दररोज ६.५० लक्ष प्रवासी लाभ घेत आहेत. परिणामी आपल्या इच्छित स्थळी पोहचण्यासाठी ठाणे स्टेशन परिसरात ठाणे शहरासह लगतच्या महानगर व उपनगरात ये - जा करणा-या नागरिकांसाठी सुयोग्य व महत्वाचे ठिकाण असणारे भारतातील सर्वात व्यस्त असे एक शहर आहे. यासाठी एबीडी क्षेत्रात नागरिकांच्या दैनंदिन स्वच्छता सुविधा असणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने ठाणे स्मार्टसिटी योजने अंतर्गत प्रकल्पाचा एक भाग म्हणून ठाणे महानगपालिका परिक्षेत्रात विविध ठिकाणी १२ अर्बन रेस्टरूम (स्वच्छतागृहे) उभारण्याबाबत महत्वाकांक्षी निर्णय घेण्यात आला.

अधिक

मसुंदा तलाव सुशोभीकरण

मासुंदा तलाव परिसराचे सुशोभिकरण करण्याचे नियोजन करण्यात आलेले असून सदर तलावालगत नागरिकांसाठी सोई सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच ठाणे शहराचे सांस्कृतीक भुतकाळाची जपणूक करण्याचे दृष्टिकोन लक्षात घेवून तलावाचे सौदर्यीकरण करण्यात येणार आहे. सदर सौदर्यीकरणामुळे तलाव परिसरात नवीन झळाळी प्राप्त होणार आहे.

अधिक

हरियाली तलावालगत विकास

ठाणे शहर तलावांचे शहर म्हणून देखील ओळखले जाते. या शहरात 35 पेक्षा जास्त तलाव अस्तित्वात आहेत. ठाणे स्मार्ट सिटीच्या क्षेत्र आधारीत विकास (ए.बी.डी.) परिसरात असलेल्या कमल, हरियाली व मासुंदा तलाव विकासांबाबतचे प्रस्ताव ठाणे स्मार्ट सिटी अंतर्गत तयार करून, नगर विकास मंत्रालय मा.भारत सरकार यांना सादर करण्यात आलेले असून ठाणे स्मार्ट सिटी अंतर्गत तलावांचे विकास कामे करण्यात येत आहेत.

अधिक